बीड : शिरूर तालुक्यात दहशत माजविणाऱ्या तीन गुंडांना बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये वडिलासह त्याच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी केली.बप्पासाहेब घरगिने, धनंजय बप्पासाहेब घरगिने व माऊली बप्पासाहेब घरगिने (रा.आर्वी ता.शिरूर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.या तिघा बापलेकांनी शिरूर तालुक्यात दहशत माजविली होती. त्यांच्याविरोधात शरीराविरूद्धची अनेक गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई केल्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शिरूरचे पोउपनि एम.आर.काझी यांनी तयार केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी याची चौकशी करून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यासंदर्भात शिफारस केली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी या तिघांनाही शनिवारी वर्षभरासाठी हद्दपार केले.
पिता आणि दोन पुत्र हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:22 AM