कडा (बीड ) : शेतातील 16 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी आष्टी तालुक्यातील खिळद येथे उघडकीस आली आहे. पशु संवर्धन विभागाने मृत कोंबड्यांचे नमुने घेतले असून तपासणीसाठी आहेत. विशेष म्हणजे, आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी 52 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. मात्र यावेळी त्यांचे नमुने घेता आले नव्हते.
आष्टी तालुक्यातील खिळद येथील तुषार नानाभाऊ गर्जॅ यांच्या शेतातील 16 कोंबड्या शनिवारी सकाळी अज्ञात रोगाने दगावल्याची घटना घडली आहे. आजवर तालुक्यात अनेक पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्ल्यूची धास्ती असली तरी आजवर पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अहवाल आल्यावरच समजेल. शनिवारी सकाळी पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ. विष्णू साबळे, पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ. अरूण तुराळे यांनी पंचनामा करून मृत कोंबड्याची विल्हेवाट लावली.
आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी 52 कोंबड्यांचा मृत्यू आठ दिवसापूर्वी तुषार गर्जॅ यांच्याच 52 कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्या होत्या. पशुसंर्वधन विभागाला याचे नमुने तपासणीसाठी घेता आले नव्हते. आता परत याच ठिकाणी 16 कोंबड्या दगावल्याची घटना घडली आहे. याबाबत आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांना सांगितले की, आजवर मरण पावलेले पक्षी किंवा कोंबड्या या बर्डॅ फ्युने मृत झाल्या नाहीत. आता खिळद येथील कोंबड्यांचा अहवाल येताच खरे कारण पुढे येईल.