शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

बीडमध्ये उडीद खरेदी बंदने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:23 AM

नाफेडच्या निर्देशानुसार सुरु केलेली उडीद खरेदी १३ डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार होती. त्यामुळे शेतकºयांची बुधवारी एकच गर्दी झाली. आपला माल विकावा म्हणून आग्रह धरत गोंधळ झाला.

ठळक मुद्देशेतक-यांचा रास्ता रोको : खरेदी सुरु करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नाफेडच्या निर्देशानुसार सुरु केलेली उडीद खरेदी १३ डिसेंबर रोजी बंद करण्यात येणार होती. त्यामुळे शेतकºयांची बुधवारी एकच गर्दी झाली. आपला माल विकावा म्हणून आग्रह धरत गोंधळ झाला. त्यामुळे खरेदी थांबवावी लागली. परिणामी उडीद विकण्यासाठी केंद्रावर आलेल्या शेतकºयांनी राष्ट्रीय महामार्गावर जिरेवाडी - मिनी बायपास येथे काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकरी शांत झाले.

बीड, आष्टी, कडा आणि पाटोदा येथे हमीभावाने उडीद खरेदीसाठी नाफेडचे केंद्र होते. ते सुरु झाले तेव्हाच १३ डिसेंबर रोजी खरेदी बंद करण्याचे निर्देश नाफेडच्या वतीने दिले होते. दरम्यान, आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांना एसएमएस मिळाल्यानंतर उडीद विकता आला. १० तारखेला जारी केलेले एसएमएस मिळाल्यानंतर मागील दोन दिवसात शेतकºयांनी खरेदी केंद्रावर मोठी गर्दी केली.

बुधवारी खरेदी सुरु होती. मात्र, गर्दीमुळे गोंधळ झाला. परिणामी खरेदी थांबवावी लागली. उडीद विकण्यासाठी आलेल्या शेतकºयांनी यावेळी व्यापा-यांचे राजरोस माप घेतले जात असल्याचा आरोप केला. उप अधीक्षक खिरडकर यांनी समजूत काढत बाजार समितीच्या पदाधिका-यांशी चर्चा केली. मध्यस्थीनंतर शेतक-यांची वाहने जवळच्या परिसरात लावण्यात आली.दिलेल्या तारखेनुसार न येता एकाच दिवशी गर्दी झाली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत माप घेण्यात आले. बुधवारच्या गोंधळामुळे पोलीस संरक्षण मागितले असून, आॅनलाईन नोंदणी झालेल्या शेतक-यांच्या उडीदाची खरेदी होणार असल्याचे संकेत जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. के. पांडव म्हणाले.११ डिसेंबरला एसएमएस आल्यानंतर उडीद घेऊन आलो. टोकन मागितले. अद्याप उडीद विक्री झाली नसल्याचे किसन सानप, महादेव सानप म्हणाले.दरम्यान, भाकप गुरुवारी बाजारसमितीसमोर निदर्शने करणार असल्याचे ज्योतीराम हुरकुडे, उत्तम सानप, एस. वाय. कुलकर्णी यांनी सांगितले.