अंबाजोगाई : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून, विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात अधिक प्रादुर्भाव आहे. शनिवार व रविवार या दोनच दिवसांत अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या ३० रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २८ जणांना अग्निडाग, तर दोन जणांचा दफनविधी करण्यात आला. दिवसेंदिवस कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालल्याने भय इथले संपत नाही... अशीच स्थिती झाली आहे.
दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अंबाजोगाई तालुक्यात फक्त एप्रिल महिन्यात चार हजारांपेक्षा जास्त रुग्ण निष्पन्न झाले आहेत, तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.
सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडी सावरगाव कोविड केअर सेंटरमध्ये मिळून हजारांपेक्षाही अधिक कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, तर शेकडो रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. शनिवार आणि रविवार या दोनच दिवसांत एकूण ३० मृतदेहांवर अंबाजोगाई नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
शेजारच्या तालुक्यातीलही रुग्ण
शेजारच्या सर्व तालुक्यांतून रुग्ण अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. ही दोन्ही ठिकाणी कोविड रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगरपालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृत हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील रहिवासी असतात, असे संबंधितांनी सांगितले.
..
....
===Photopath===
250421\20210425_175856_14.jpg