: प्रशासनाने विचारात न घेता लॉकडाऊनचा शिथील कालावधी केवळ दोन तासांचा ठेवल्याने जिलह्यातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात बंद पुकारला होता. माजलगाव शहरात व्यापाऱ्यांनी एक दिवस कडकडीत बंद पाळला. मात्र दुसऱ्या दिवसापासून थोडया प्रमाणात दुकाने उघडली तर रविवारी निम्म्यापेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांत फूट पडल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढत असल्याने व होळीचा सण तोंडावर आल्याने जिल्हा प्रशासनाने १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. यामुळे गुरुवारी मध्यरात्रीपासून या लॉकडाऊनला सुरूवात झाली. शनिवारी काही व्यापाऱ्यांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत आपली दुकाने उघडली. तर रविवारी निम्मयापेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने उघडली. प्रशासनाने ठरवुन दिलेल्या वेळेत व्यापाऱ्यांनी सुरळीतपणे व्यवहार केला. यामुळे माजलगाव शहरातील व्यापाऱ्यांत फूट पडली.
काही पदाधिकारी आपल्याला श्रेय मिळावे यासाठी व्यापाऱ्यांसह ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम करत असून आम्हाला देखील महिन्याला मोठा खर्च आहे. आम्ही हा खर्च कोठून काढायचा व आम्ही खायचे काय असा प्रश्न अनेक व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
प्रशासनाच्या विरोधात लॉकडाऊन असेपर्यंत बंद
आम्ही प्रशासनाच्या विरोधात लॉकडाऊन असेपर्यंत बंद पुकारला होता. परंतु काही व्यापाऱ्यांनी आज दुकाने उघडली होती. संघटनेने कळवूनही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. दुकान चालु ठेवायची की बंद ठेवायची हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे.--- संजय सोळंके , अध्यक्ष किराणा व्यापारी असोसिएशन माजलगाव