जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांची सध्या समुपदेशनाने बदल्या केल्या जात आहेत. बुधवारीही ही प्रक्रिया सुरूच होती. याच दरम्यान गणेश गायकवाड नामक ग्रामसेवकाला अचानक तोंडातून फेस आल्यासारखे झाले, त्यामुळे सर्वच घाबरले. सीईओ अजित कुंभार यांनी तत्काळ आपले वाहन बोलावून घेत गायकवाड यांना सुरक्षारक्षक व इतर कर्मचाऱ्यांमार्फत जिल्हा रुग्णालयात दाखल करत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांना माहिती दिली. ग्रामसेवकाला फीवर क्लिनिकमध्ये दाखल करून त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. त्यांना ऑक्सिजन लावून स्थिर करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. रेवडकर यांच्यासह माजलगावचे डॉ. यशवंत राजेभोसले यांनी ग्रामसेवकावर उपचार केले.
280721\28_2_bed_9_28072021_14.jpeg
जिल्हा रूग्णालयात ग्रामसेवकावर उपचार करताना डॉ.सुरेश साबळे, डॉ.यशवंत राजेभोसले आदी.