बीड : शेतीच्या कारणावरून धारूर तालुक्यातील चाटगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवार, गज, टाँबी, कुºहाड अशी हत्यारे यामध्ये वापरण्यात आली होती. या हाणामारीत चौघे गंभीर जखमी झाले असून इतर किरकोळ जखमी आहेत. ही घटना २४ मे रोजी दुपारी १२ वाजता चाटगाव शिवारात घडली. याप्रकरणी सोमवारी दिंद्रूड पोलीस ठाण्यात परस्पर २७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.विजयमाला रामभाऊ मुंडे (रा.चौंडी ता.धारूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ मोरे याने विजयमाला यांना कुºहाडीने तर भागवत गोरे याने गजाने मारहाण केली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. हे भांडण सोडविण्यासाठी विजयमाला यांची सुन धावली. यावेळी तिलाही गजाने मारहाण करण्यात आली. इतर लोकांनाही १३ जणांनी मारहाण केली. याप्रकरणी नानभाऊ गोरे, जगन्नाथ गोरे, नवनाथ गोरे, बंडु गोरे, रामेश्वर गोरे, भागवत गोरे, पांडुरंग गोरे, सीताबाई गोरे, सुनीता गोरे, प्रमिला गोरे, ज्योती गोरे, रत्नमाला गोरे, राधाबाई गोरे (सर्व रा.चाटगाव ता.धारूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.तर पांडुरंग गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील नानाभाऊ गोरे यांना श्रीहरी मुंडे, संतोष मुंडे व गोविंद मुंडे या तिघांनी तलवारीने मारहाण केली. त्यानंतर पांडुरंग गोरे यांना इतर १४ आरोपींनी लोखंडी गज, टाँबी, तलवारीने मारहाण केली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. गोर यांच्या फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे, संतोष मुंडे, गोविंद मुंडे, दिनकर मुंडे, बाबा मुंडे, बाबु मुंडे, प्रयागा मुंडे, महादेव मुंडे, शाम मुंडे, कृष्णा मुंडे, दादासाहेब मुंडे, रोहिदास मुंडे, विजयमाला मुंडे, गंगाबाई मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, घटना समजताच दिंद्रूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पुंडगे हे कर्मचाऱ्यांसह चाटगावात दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जखमींच्या जबाबावरून गुन्हा दाखल झाला.
शेतीवरून बीड जिल्ह्यात तलवारबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:23 AM
बीड : शेतीच्या कारणावरून धारूर तालुक्यातील चाटगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तलवार, गज, टाँबी, कुºहाड अशी हत्यारे यामध्ये वापरण्यात आली होती. या हाणामारीत चौघे गंभीर जखमी झाले असून इतर किरकोळ जखमी आहेत. ही घटना २४ मे रोजी दुपारी १२ वाजता चाटगाव शिवारात घडली. याप्रकरणी सोमवारी दिंद्रूड पोलीस ठाण्यात ...
ठळक मुद्दे२७ जणांविरोधात परस्परविरोधी तक्रारी