शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
8
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
9
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
10
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
11
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
12
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
13
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
14
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
15
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
16
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
17
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
18
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
19
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
20
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

नागझरीत तलवारबाजी; एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:07 AM

 जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीतून नंतर तलवारबाजी झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देजुन्या वादातून घडलेली घटना : कंदुरीचे जेवण जिवावर बेतले; एक जण गंभीर जखमी

गेवराई :  जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीतून नंतर तलवारबाजी झाली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील नागझरी येथे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमी लोक कंदुरीच्या जेवणाच्या कार्यक्रमात असतानाच हा हल्ला झाल्याने सर्वांचीच धावपळ झाली.उत्तरेश्वर भारत पवार (३५) असे मयताचे नाव असून नारायण भारत पवार हा गंभीर जखमी आहे. नारायणच्या डोक्यात खोलवर वार झालेला असून पाठीवर आणि पोटावरही तलवारीचे वार असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास भारत पवार यांच्या शेजाऱ्याच्या शेतात कंदुरीचा कार्यक्रम होता. पवार कुटुंब तेथे जेवणासाठी गेले होते. बीडमध्ये राहणारा उत्तरेश्वरही या कार्यक्रमाला आला होता. जेवण सुरू असतानाच पाच ते सहा जण अचानक धावत आले आणि पवार यांच्यावर हल्ला चढविला. काही समजण्याच्या आतच कुºहाड, तलवारीने समोर उभा असलेल्या उत्तरेश्वरवर हल्ला चढविला. यामध्ये तो जागीच ठार झाला. तर त्याला वाचविण्यासाठी धावलेला त्याचा भाऊ नारायण याच्यावरही त्यांनी हल्ला चढविला. यामध्ये नारायणच्या डोक्यात तवारीचा खोलवर वार गेला. तसेच पोटावर आणि पाठिवरही तलवारीने हल्ला केला. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात तो पडला. याचवेळी संगीता साईनाथ चव्हाण आणि शिवकन्या नारायण पवार या दोघींनाही त्यांनी मारहाण करून तेथून पळ काढला.उपस्थित लोकांनी जखमींना तात्काळ गेवराई उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. येथे नारायणवर उपचार सुरू होते. तलवारीचे वार खोलपर्यंत गेलेला असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.नागझरी येथील वादाचे कारण मात्र उशिरापर्यंत समोर आले नाही. जखमींनी समोरच्यांनी जुन्या वादातून आमच्यावर हल्ला केल्याचे सांगितले.तिघांना घेतले ताब्यातघटनेची माहिती मिळताच या भागात दरोड्याचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील दोन मुख्य हल्लेखोरांना अर्धा तासात बेड्या ठोकल्या. सपोनि अमोल धस, साजिद पठाण, सखाराम पवार यांचा या पथकात समावेश होता. तर एकाला गेवराई पोलिसांनी पकडले. ते सध्या गेवराई ठाण्यात आहेत.एसआयडीचे पथक तळ ठोकूनजखमी व मारेकऱ्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. हाच धागा पकडून राज्य गुप्त वार्ताचे (एसआयडी) अधिकारी, कर्मचाºयांनी येथे धाव घेत माहिती काढणे सुरू केले. उशिरापर्यंत ते येथेच तळ ठोकून होते.

टॅग्स :BeedबीडMurderखूनBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी