शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

झुंज संपली ! विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 4:37 PM

दिलीप भोसले याने मंगळवारी सकाळी विष प्राशन केले होते

गेवराई ( बीड ) : तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील एका 24 वर्षीय तरुणाने मंगळवारी विष प्राशन केले होते. त्याचा उपचारा दरम्यान आज मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. दिलीप भगवान भोसले ( 23) असे मृताचे नाव आहे. 

दिलीप भोसले याने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचे नातेवाईकांना लक्षात येताच त्यांनी दिलीपला उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरु असताना आज सकाळी दिलीपचा मृत्यू झाला. दिलीपच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीपच्या पश्चात आई , वडील, दोन मोठे भाऊ असा परिवार आहे.

भर दुपारी व्यापाऱ्यास लुटलेगेवराई शहरातील महेश कॉलनी येथे राहणारे गंगाभिषण बिहारीलाल भुतडा ( ५९ )  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गंगाभिषण भुतडा यांचे श्रीनिवास भुसार (कडधाण्याचे) मालाचे दुकान मोंढा भागात आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता दुचाकीवरून घराकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी आवाज देऊन थांबवले. आम्ही गुन्हे शाखेचे असून तुम्हाला दोनदा आवाज दिले, तुम्ही थाबले नाहीत. सोमवारी रात्री ५ ते६ लाखाचा गांजा पकडला असून या प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे अशी थाप मारली. यानंतर त्या दोघांनी भुतडा यांना रुमाल काढण्यास सांगून त्यात अंगावरील दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल ठेवण्यास सांगितले. हातचलाखी करत त्यांनी दागिने व रक्कम काढून घेत मोबाईल भूतडांना परत केला.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीड