बीड : भावकीत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात दोन्ही गटांत तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना धारुर तालुक्यातील आसोला येथे घडली.
पहिल्या घटनेत बंडू पंढरी चोले यांच्या फिर्यादीवरून त्यांना वाटून आलेल्या शेतात घराचा पाया खोदण्यासाठी ते गेले होते. यावेळी ‘हे आमचे शेत आहे या ठिकाणी काही करायचे नाही’ असे म्हणत त्यांना मारहाण करुन शिवीगाळ केली. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात व्यंकट पंढरी चोले, भागीरथीबाई चोले, राजेंद्र चोले, मनीषा चोले, रवींद्र चोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत भागीरथी व्यंकट चोले यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या शेतातील पाइपलाइन तोडली, यावेळी ‘आमची पाइपलाइन का तोडली’ असा जाब विचारल्यामुळे त्यांना मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्यांनीदेखील धारूर पोलीस ठाण्यात बंडू पंढरी चोले, दिनेश चोले, लहूदास चोले, गोविंद चोले, बिभीषण चोले, अमोल चोले, मोतीराम चोले, कुशाबाई चोले, उषाबाई चोले, अनुसया चोले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कातकडे, गुंड हे करीत आहेत.