शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

ढोकेश्वर मल्टीस्टेट संचालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:16 AM

बीड जिल्ह्यातील जनतेस धोका देऊन लुटणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता ढोकेश्वर मल्टीस्टेटचा देखील समावेश झाला आहे. ‘ढोकेश्वर’ने अंबाजोगाईतील ठेवीदारांना अधिक व्याज दाराचे आमिष दाखवून ७३ लाख ५५ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी ६८ ठेवीदारांनी एकत्रित येत अंबाजोगाई पोलिसात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून ढोकेश्वरचे संचालक मंडळ आणि कर्मचाºयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे६८ ठेवीदारांनी एकत्रित येत अंबाजोगाई ठाण्यात दिली फिर्याद

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील जनतेस धोका देऊन लुटणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता ढोकेश्वर मल्टीस्टेटचा देखील समावेश झाला आहे. ‘ढोकेश्वर’ने अंबाजोगाईतील ठेवीदारांना अधिक व्याज दाराचे आमिष दाखवून ७३ लाख ५५ हजार रुपये हडप केल्याप्रकरणी ६८ ठेवीदारांनी एकत्रित येत अंबाजोगाई पोलिसात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून ढोकेश्वरचे संचालक मंडळ आणि कर्मचाºयांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात मल्टीस्टेटमध्ये अनेक गैरप्रकार घडत आहेत. शुभकल्याण, परिवर्तन या मल्टीस्टेटनी ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये लाटल्याची प्रकरणे नुकतीच उघडकीस आली असून जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. ही प्रकरणे ताजी असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-आॅप. क्रेडीट सोसायटीने ठेवीदारांच्या केलेल्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. दोन वषार्पूर्वी अंबाजोगाई शहरात ढोकेश्वर मल्टीस्टेटची शाखा थाटामाटात सुरु झाली होती. शाखा सुरु होताच या मल्टीस्टेटने जाहिरातबाजीचा धडाका सुरु केला. विविध प्रसार माध्यमांचा वापर करून गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविण्यात येऊ लागले.

या आमिषाला भुलून तक्रारदार मधुसूदन रंगनाथ मोरगावकर यांनी ढोकेश्वरमध्ये १२ महिन्याच्या मुदतीसाठी ६ जुलै २०१६ रोजी एक लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली होती. या मुद्दलाला १२ टक्केप्रमाणे १ लाख १४ हजार रुपये ६ जुलै २०१७ रोजी देणे अपेक्षित होते. परंतु, सदरील मल्टीस्टेटच्या कर्मचाºयांनी ठेवीची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ सुरु केली. कर्मचारी आपली ठेव परत देत नसल्यामुळे मोरगावकर यांनी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाकडे तक्रार करून मुदत ठेवी रक्कम देण्यासाठी विनंती केली. परंतु, संचालक मंडळाने देखील या ठेवीदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. मोरगावकर यांच्यासारखाच अबुभाव इतर ६७ गुंतवणूकदारांना देखील आल्याने ढोकेश्वरकडून आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे एकूण ६८ ठेवीदारांनी एकत्रित येत मधुसूदन मोरगावकर यांच्या नावे अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ढोकेश्वर मल्टीस्टेटचे संचालक मंडळ आणि कर्मचाºयांच्याविरुद्ध विरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक गजानन तडसे हे पुढील तपास करत आहेत.

यांच्याविरुद्ध झाला गुन्हा नोंदमधुसूदन मोरगावकर यांच्या फिर्यादीवरून ढोकेश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष सतीश पोपटराव काळे, उपाध्यक्ष भाऊसाहेब इंद्रराव शिदे, संचालक शिवाजी बाबूराव जाधव, भास्कर तुकाराम खुर्दे, रफीक मोहम्मद शेख, नानाराव भाऊराव देशमुख, देवराव नारायण शिदे, रुपा जयवंत राशिनकर, प्रणाली मदन रामोळे, शोभा राजेंद्र शेवाळे, विठ्ठल रंगनाथ वाघ, क्षेत्रीय व्यवस्थापक सुरेश, मारुतीराव काळे, प्रभारी व्यवस्थापक सय्यद लाल तळेगावकर, विपणन अधिकारी ज्ञानोबा लाड, रोखपाल विजय चव्हाण, लिपिक जगन्नाथ उगले, लिपिक कल्पना पांडुरंग पवार, लिपिक ज्योती प्रकाशराव झंवर बागला, लिपिक मनीषा प्रेमनाथ पवार, लिपिक महेश श्रीकृष्ण तोष्णीवाल, माजी क्षेत्रीय व्यवस्थापक सूर्यकांत वैजनाथअप्पा निर्मळे, माजी लिपिक गंगाधर नंदीकोल्हे (सर्व रा. लासलगाव ता. निफाड जि. नाशिक शाखा अंबाजोगाई) यांच्यावर कलम ४०६, ४२०, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा