बीड : राज्यभरात १ जुलै रोजी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेस सुरु वात करण्यात आली आहे. यावर्षी बीड जिल्ह्यासाठ सव्वा कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यासाठी विविध शासकीय विभागांसह वृक्ष प्रेमी व पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होणार आहेत, त्यासाठी त्यांना ३ लाख रोपे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच सर्वांनी वृक्ष लागवडीसोबतच संगोपण काळजीपुर्वक करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात वृक्षलागवड मोहिमेच्या आढाव्याची बैठक जिल्हाधिकारी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते तसेच पाच वर्षीय वृक्षप्रेमी अनुज नागरगोजे यासह वन विभागाचे उपविभागीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी शासकीय अधिकारी, पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंसेवक आणि नागरिकांचा सहभाग होता.यावेळी बोलताना वन अधीकारी अमोल सातपुते म्हणाले वृक्षलागवड मोहिमेमध्ये जिल्ह्यातील नागरिक स्वयंसेवी संस्था आदींचा चांगला सहभाग राहिला आहे. नागरिकांना लागवड करावयाची विविध प्रकारचे झाडे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे वन विभाग, कृषी विभाग सज्ज झाले आहेत. संस्थांना त्यांच्या मागणीनुसार वृक्ष रोपे उपलब्ध करून दिली जातील. तसेच व्हॉट्सअप गृपच्या माध्यमातून देखील वृक्ष संगोपण चळवळ राबवली जाणार आहे. नागरिकांच्या सहभागाने जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेला चांगले यश मिळत असल्याचे सातपुते यावेळी म्हणाले.राष्ट्रीय स्वंय सेवक संघचा विशेष उपक्रमजिल्ह्यात वृक्ष लागवडीसोबत नागरी भागात संगोपण देखील व्हावे यासाठी स्वयंसेवक संघाच्या वतीने तीन टप्प्यात कार्यक्रम घेतला जाणार आहे. यामध्ये ५ हजार स्वंयसेवक सहभागी होणार असून, परिसरातील नागरिकांना वृक्ष लागवड व संगोपण मोहिमेत सहभागी करुन वर्षभर ही मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती देवगिरी प्रांताचे संपर्क प्रमुख डॉ.सुभाष जोशी यांनी दिली.
वृक्ष लागवडीसोबतच संगोपनावर भर द्यावा - पाण्डेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:16 AM
सर्वांनी वृक्ष लागवडीसोबतच संगोपण काळजीपुर्वक करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.
ठळक मुद्देवृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्थांना तीन लाख रोपे मोफत दिले जाणार; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग