धारूर ( बीड ) : पाच गावच्या ग्रामस्थांचा विरोध असताना रविवारी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सुरक्षितेचे कारण पुढे करत आरणवाडी येथील तलावाचा सांडवा फोडला. आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल १७ वर्षानंतर पूर्ण झाले आहे. पहिल्याच वर्षी अधिकाऱ्यांनी सांडवा फोडून २० टक्के साठा कमी केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
धारूर तालूक्यात आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या सतरा वर्षापासून संथ गतीनै सुरू होते. यावर्षी हे काम कसे तरी पूर्ण झाले. त्यानंतर पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठा मुबलक प्रमाणात जमा झाला. दरम्यान, या तलावाच्या बाजूने गेलेल्या पर्यायी राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना रस्त्याची उंची वाढवली नाही. एमएसआरडी ने २० जुलैला पञ देऊन पाणी साठा कमी ठेवावा, रस्त्यास धोका होऊ शकतो, असे कळवले. त्यानंतार पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे झाले. तलावाचे सुरक्षितेचे कारण पुढे करत ८० ते ८५ % पाणी ठेवता येईल, असे निरीक्षण नोंदवून सुरक्षितेसाठी सांडवा फोडावाच लागेल अशी भुमिका घेतली. माञ, पाच गावच्या ग्रामस्थांनी यांला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. मात्र, शनिवारी रात्री पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांनी अचानक पञ देऊन रविवारी सकाळी हा सांडवा फोडण्यास सुरूवात केली.
अधिकार शाहीपुढे ग्रामस्थांची नरमाई हा सांडवा उभा दोन मिटर तर आडवा दहा फुट फोडण्यात येत असून अधिकारशाही पुढे ग्रामस्थाना हात टेकावे लागले. अधिकाऱ्यांचनी भीतीने कुठलेहि शासन पञक व नियम, निर्णय नसताना सांडवा फोडला असेल तर वरीष्ठ पातळीवरून यांची चौकशी होणे आवश्यक आहे.
गाव आणि तलावाच्या सुरक्षेसाठी सांडवा फोडला आरांवादी साठवण तलावाचे काम यावर्षी पूर्ण झाले. या तलावात ९० टक्के पाणीसाठा झाला. पहिले वर्ष असल्याने पाणीसाठा कमी असणे तलावाच्या सुरक्षितेसाठी आवश्यक होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणीनंतर तलावाखालील गावाची सुरक्षा लक्षात घेता हा सांडवा फोडणे आवश्यक होते. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा सांडव्याचे काम पूर्ववत करण्यात येईल, असे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू.व्ही. वानखेडे यांनी सांगितले.
सांडवा फोडणे दुर्दैवी तलावाचे काम याच वर्षी झालेले असून पाणीसाठा झालेला असताना सांडवा फोडावा लागणे, हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांचा विरोध असताना तो फोडल्यामुळे चौकशाची मागणी शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे.