बीड : मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद होती. ती सोमवारी सुरु करण्यात आली. यामुळे रुग्णांचा आर्थिक भूर्दंड कमी होणार आहे.जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन खराब झाली होती. तिच्या दुरुस्तीसाठी जिल्हा रुग्णालय प्रशानाकडून उपसंचालक व आयुक्त कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. याला अखेर यश मिळाले. सर्व काही उपलब्ध झाले होते. मात्र, केबल नसल्याने ती सुरु करण्यास अडचणी होती. शासनाकडे निधीची मागणीही केली होती. मात्र, या निधीची वाट न पहाता सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून हे केबल उपलब्ध केले आणि सोमवारी ती सुरु करण्यात आली. खटोड प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी हे केबल उपलब्ध करुन दिले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी खटोड यांचा केबल दिल्याबद्दल सत्कार केला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, सुधीर देशमुख, हौसराव पवार, विलास लेंबे, डॉ.पवार, डॉ.हुबेकर, डॉ.जैन यांच्यासह सिटीस्कॅन, सोनोग्राफी विभागातील टिम उपस्थित होती.सीटीस्कॅन मशीन सुरु करण्यात आली आहे. नागरिकांनी आता जिल्हा रुग्णालयातच सीटीस्कॅन करून घ्यावे. काही अडचण वाटल्यास माझ्याशी किंवा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केले आहे.खटोड प्रतिष्ठाणचा आरोग्य विभागाला आधारसामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठाणच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयाला अनेकवेळा मदत केलेली आहे.यापूर्वी अतिदक्षता विभागात जवळपास तीन लाख रुपये खर्च करुन बेड, गादी व इतर साहित्य उपलब्ध करुन दिले होते.आता सीटीस्कॅन मशीनलाही जवळपास दोन लाख रुपये खर्च करुन केबल उपलब्ध करुन दिले.त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे सीएस डॉ.अशोक थोरात यांनी प्रशासनाच्या वतीने गौतम खटोड यांचे स्वागत केले.
अखेर बीड जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:52 PM
मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद होती. ती सोमवारी सुरु करण्यात आली. यामुळे रुग्णांचा आर्थिक भूर्दंड कमी होणार आहे.
ठळक मुद्देआर्थिक भुर्दंड टळणार : तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली; खाजगी रुग्णालयाची दुकानदारी बंद