धारुर : धारुर तालुका मेडिकल असोसिएशनच्या सर्व सभासदांनी एकत्र येऊन ६२ हजार रुपयांचा निधी जमा केला. कोरोना महामारीत सामाजिक बांधीलकीतून हा निधी धारुर शहरातील ग्रामीण रुग्णालयास यंत्र सामग्रीसाठी देण्यात आला.
बीड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण बरकसे, बीड जिल्हा मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष अरुण काळे, डॉ. अमोल दुबे, डॉ. मयूर सावंत, पत्रकार सय्यद शाकेर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आर्थिक मदत किल्ले धारूर शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांच्याकडे सुपूर्द केली. या आर्थिक मदतीने नक्कीच किल्ले धारूर शहरातील व तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी किल्ले धारुर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष योगेश शेटे, उपाध्यक्ष धनंजय थोरात, विनोद शिनगारे, कुलदीप जगताप, सुहास चिद्रवार, निमेश चिद्रवार, राधेश्याम सारडा, आनंद सोळंके, दत्तात्रय साखरे, धनंजय लांब, नागरगोजे, गजानन पवार, दत्ता देशमुख हे उपस्थित होते.
===Photopath===
210521\img_20210521_103710_14.jpg
===Caption===
धारूर आरोग्य केंदास मदतीचा धनादेश सुपुर्द करताना तालुका मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी.