सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे अर्थिंगसाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी कमी पडत आहे. तर दुसरीकडे शेतांमध्ये पिकाला पाणी देण्यासाठी विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढत्या वापरामुळे विद्युत केंद्रातून होणाऱ्या वीज पुरवठ्यावर परिणाम होत आहे. परिणामी मोठे आवाज होऊन ठिणग्या पडत आहेत. ३३ के.व्ही. केंद्राच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार सुरू आहे. सोमवारी दुपारी यामुळे आगीची घटना घडली. यात शेजारचे शेतकरी बालासाहेब नायकोडे, वशिष्ठ नायकोडे, बन्सी थोरात, मारुती थोरात, भागवत देठे, राजाभाऊ देठे, नवनाथ कदम आदींचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. विद्युत केंद्रातून पडणाऱ्या ठिणग्या व स्पार्किंग राेखण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
===Photopath===
260421\img-20210426-wa0103_14.jpg