कडा : कुक्कुटपालन केंद्राला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. तर केंद्रातील कोंबड्या व पिलांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच इतर साहित्यही जळून खाक झाले. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथे रविवारी दुपारी घडली.रमेश नारायण रासकर यांनी आपल्या शेतात कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. शेतात उभारलेल्या शेडला रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये कोंबड्यांसह त्यांची ५ हजार पिलांचा होरपळून मृत्यू झाला. पशुखाद्यासह इतर साहित्य देखील आगीच्या भक्सस्थानी झाले. यामध्ये रासकर यांचे ९ ते १० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तलाठी भाग्यश्री खडसे यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. दरम्यान, या शेतकऱ्यास शासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खाकाळ यांनी केली आहे.
कुक्कुटपालन केंद्राला आग; कोंबड्यांसह पिलांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:20 AM