लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : तालुक्यातील केरुळ व मांडवा या गावाच्या सीमेवरील टेंभीदेवी टेकडीला अज्ञात व्यक्तीने गुरुवारी (ता. १५) दुपारी दोनच्या सुमारास आग लावली. या आगीत सात हेक्टरचा भाग जळाला आहे. गावकरी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली असून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा झाला आहे.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभीदेवीच्या टेकडीवर जुलै महिन्यात शाळा, महाविद्यालय व गावकºयांनी मिळून दोन हजार वृक्ष लावले होते. यावर्षी तालुक्यात सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने गवत वाळलेले होते. गुरुवारी दुपारी देवीचे दर्शन घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने दुपारी दोनच्या सुमारास आग लावली. वाºयामुळे आग भडकली व सात हेक्टरचा भाग जळाला. सदरील घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनपाल महाजन, वनपाल धसे, वनरक्षक सोनकांबळे, वनरक्षक अनिल जगताप, राणी सातपुते, वनमजुर शेख युनूस, कुमखले यांनी घटनास्थळी जाऊन गावकºयांच्या मदतीने एक तासाच्या प्रयत्नाने व फायर ब्लोअर यंत्राच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी महसूलचे कर्मचारी शेळके, जाधव, शेळके यांनी भेट देऊन पाहणी केली.
केरुळ-मांडवा गावच्या टेंभीदेवी टेकडीवर आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:29 AM