बीड : विविध कॅन्सरग्रस्त रूग्णांची आता बार्शी, औरंगाबाद वारी टळणार आहे. बीड जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू केला जाणार आहे. अजार पाहून रूग्णांवर उपचार केले जाणार आहेत. अतिगंभीर रूग्णांना मात्र, सध्यातरी औरंगाबादला पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पहिल्यांदाच हा कक्ष बीड जिल्ह्यात सुरू होत असून मोफत उपचार होणार असल्याने रूग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे.बीड जिल्ह्यात स्तन, गर्भाशय मुख, तोंडाचा कॅन्सर झालेले अनेक रूग्ण आहेत. त्यांना उपचारासाठी पूर्वी बार्शी किंवा औरंगाबादला जावे लागत होते. मात्र, आता बीड जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बुधवारपासून प्रत्यक्षात रूग्ण तपासणीला सुरूवातही होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.दरम्यान, सध्या तरी जिल्हा रूग्णालयाल औषधे व इंजेक्शन उपलब्ध झालेले आहेत. शस्त्रक्रिया व विविध थेरपीच्या सुविधा अद्याप नाहीत. एक डॉक्टर व एका परिचारिकेने १४ आठवड्यांचे प्रशिक्षण मुंबईला घेतले आहे. हेच दोघे येथे येणाऱ्या प्रत्येक रूग्णावर उपचार करून त्याला पुढील मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या तिसºया शनिवारी औरंगाबाद येथील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विराज बोरगावकर बीडच्या रूग्णांची तपासणी करणार असल्याचेही सांगण्यात आले.कक्ष सर्वसामान्यांसाठी लाभदायक४एका वेळेस थेरपी करायचे म्हटले तर किमान २० हजार रूपयांच्या पुढे खर्च येतो. मात्र, येथे आता रूग्णाचा आजार पाहून उपचार केले जाणार आहेत. त्यांचा हा आर्थिक भुर्दंडही कमी होणार आहे.४त्यामुळे हा कक्ष सर्वसामान्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. काही इफेक्ट जाणवू नये, यासाठी आयसीयू कक्षाच्या बाजूलाच हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात ‘केमोथेरपी’ची पहिल्यांदाच सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:11 AM