बीड : अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर येथे चंदन तस्करी करणाऱ्या सात जणांवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली. यातील पाच आरोपींना अटक केली असून, दोघे फरार आहेत.दत्तपूर परिसरात सात जण चंदनाची झाडे तोडत असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार परळी येथील वन परिक्षेत्र अधिकारी आर.बी. शिंदे व त्यांच्या पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी ७ पैकी ५ जणांना त्यांनी अटक केली, तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून ४९ किलो व चंदनाचा गाभा व लाकडे जप्त करण्यात आली. तसेच सात जणांवर वन विभागातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केले असता २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.दरम्यान, चौकशी केली असता ही चंदनाची लाकडे व गाभा केज तालुक्यातील होळ येथील हनुमंत घुगे हा चंदन तस्कर विकत घेत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी आर.बी. शिंदे यांनी दिली. ही कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी परळी आर. बी. शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी धारूर मुंडे यांच्या पथकाने केली.आरोपींची नावे देण्यास टाळाटाळदत्तपूर येथे चंदन तस्करांवर २६ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली. यापूर्वी कारवाई केल्यानंतर प्रसार माध्यमांना माहिती दिली जात होती; मात्र कारवाई होऊन चोवीस झाले तरी याप्रकरणी कमालीची गुप्तता पाळली जात असल्याबद्दल वन विभागाच्या कारभाराविषयी संशय निर्माण होत आहे.चंदन तस्करीमधून आर्थिक उलाढालजिल्ह्यातील धारूर, केज, अंबाजोगाई, परळीसह इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चंदनाच्या झाडांची कत्तल करून अवैधरीत्या तस्करी केली जाते. याकडे मात्र वन विभागाच्या अधिका-यांकडून अर्थपूर्ण कानाडोळा केला जात आहे.
दत्तपूर येथे पाच चंदन तस्कर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:18 PM
अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर येथे चंदन तस्करी करणाऱ्या सात जणांवर वन विभागाच्या पथकाने कारवाई केली. यातील पाच आरोपींना अटक केली असून, दोघे फरार आहेत.
ठळक मुद्देसूत्रांची माहिती : हप्तेखोरीमुळे तस्करी वाढली