धारुर : धारूर येथील चिंचपूर रोड लगत असणा-या खारी भागातील सर्वे नंबर ९३, ९४, ९५, १०१, ११५ व ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे आपली बैलगाडी जनावारांसह तहसीलसमोर शेतक-यांनी उपोषण सुरु केले होते, प्रशासनाने याची दखल घेत रस्ता खुला केला आहे, त्यानंतर शुक्रवारी पाचव्या दिवशी शेतकºयांनी उपोषण सोडले.धारूर शहरापासून चिंचपुर रोडवर अर्धा किलोमीटर अंतरावर खारी हा भाग आहे. या भागातील २५ शेतकºयांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना शेती वाहण्यासाठी अडचण होत होती. आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या शेतातून जाऊ देत नाहीत. बºयाच वेळेला इतरांच्या शेतातून गेल्यामुळे भांडण तंटे होत आहेत. त्यामुळे या शेतकºयांची एकूण १२५ एकर जमीन पडीक पडली आहे. या संदर्भात प्रशासनाला तीन वेळा निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची हालचाल न झाल्यामुळे १८ फेब्रुवारी रोजी शेतकºयांनी पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी तहसिलदारांना लेखी निवेदन देऊन उपोषण सुरु केले होते. हे उपोषण मागे घ्यावे तसेच शेतात जाण्यासाठी रस्ता खुला व्हावा यासाठी तहसीलदार सुनिल पवार, पोनि अनिल जाधव, ना.तहसीलदार सुहास हजारे, नगराध्यक्ष डॉ.स्वरूपसिंह हजारी यांनी प्रयत्न केले. पाचव्या दिवशी प्रत्यक्ष रस्ता वहिवाटीसाठी प्रशासनाच्या वतीने खुला केल्याने शेतकºयांनी उपोषण सोडले. यावेळी नगराध्यक्ष डॉ.हजारी,ना.तहसीलदार हजारे, अनिल महाजन, सुधीर शिनगारे, सय्यद शाकेर, प्रा.विजय शिनगारे, सूर्यकांत जगताप,दिनेश कापसे, सचिन थोरात उपस्थित होते.
पाच दिवस शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर रस्ता खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:08 AM
धारूर येथील चिंचपूर रोड लगत असणा-या खारी भागातील सर्वे नंबर ९३, ९४, ९५, १०१, ११५ व ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे आपली बैलगाडी जनावारांसह तहसीलसमोर शेतक-यांनी उपोषण सुरु केले होते, प्रशासनाने याची दखल घेत रस्ता खुला केला आहे,
ठळक मुद्देचिंचपूर रोडवरील खारी भागातील प्रश्न : २५ शेतकºयांना शेतात जाण्यासाठी नव्हता रस्ता; आंदोलन करुनही होते दुर्लक्ष