जिल्ह्यात शनिवारी ४ हजार ९५४ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल रविवारी दुपारी प्राप्त झाले. यात १७४ पॉझिटिव्ह तर ४ हजार ७८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अंबाजोगाई व परळी तालुक्यांत एकही रुग्ण निष्पन्न झाला नाही. बाधितांमध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ५२, बीड २६, धारूर ४, गेवराई १२, केज ११, माजलगाव ७, पाटोदा २०, शिरूर ३२ व वडवणी तालुक्यातील १० रुग्णांचा समावेश आहे.
तसेच मागील २४ तासांत ५ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली. यात दुकडेगाव (ता. वडवणी) येथील ६५ वर्षीय पुरुष, चिखली (ता. गेवराई) येथील ८० वर्षीय पुरुष, मैंदा (ता. बीड) येथील ९८ वर्षीय पुरुष, फुलसांगवी (ता. शिरूरकासार) येथील ८५ वर्षीय पुरुष व करमाळा (जि. सोलापूर) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ९४ हजार ८१२ इतकी झाली आहे. पैकी ९० हजार ८८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २ हजार ५७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.