बीड : जिल्ह्यात राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कारवाई केली होती. त्यानंतर अवैध वाळू उपसा व वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. याच दरम्यान घेण्यात आलेल्या बैठकीत एक पोलीस अधिकारी आणि वाळू वाहतूकदार आणि ठेकेदार यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर कोणत्या अधिका-याला किती हप्ता दिला जातो याचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले होते. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. अधिवेशनामध्ये लक्षवेधी झाली होती. यातील ५ पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कारवाई करत त्यांना मुख्यालयाला संलग्न केले आहे.राज्यभर गाजलेल्या बीड जिल्ह्यातील ‘वाळूच्या रेटकार्ड’ प्रकरणात ५ पोलीस कर्मचाºयांवर कारवाई झाली. त्यांना मुख्यालयास संलग्न करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बुधवारी दिली. यामध्ये भारत बंड, नितीन साळवे, अशोक तिपाले, राजेभाऊ गर्जे, योगेश बहिरवाळ अशी कारवाई करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाºयांची नावे आहेत. वाळू ठेकेदार व वाहतूकदारांनी दिलेल्या या तक्रारीमध्ये अनेकांनी माघार घेतली होती. त्यापैकी ७ जण आपल्या आरोपावर ठाम राहिले, त्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व बाजूंनी तपास केला. त्यानंतर या पाच जणांना मुख्यालयात संलग्न केले आहे.जिल्हाधिकाºयांनी देखील त्याच वेळी कारवाई करत संबंधित महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई केली होती. दरम्यान या चौकशी प्रस्तावाची माहिती पुढील कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्तालयाकडून मागवण्यात आली आहे.लक्षवेधीसाठी मागवला चौकशी प्रस्तावविधान परिषदेत करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेसाठी बीडमधील ७ महसूलचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने मागवला आहे.दरम्यान यामध्ये महसूल व पोलीस प्रशासनातील काही वरिष्ठ अधिका-यांचा समावेश आहे का, याची देखील चौकशी केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
वाळू ‘रेट कार्ड’ प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:32 PM
बीड : जिल्ह्यात राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कारवाई केली होती. त्यानंतर अवैध वाळू उपसा व ...
ठळक मुद्देवाळू प्रकरणी विधान परिषदेत लागली होती लक्षवेधी : विभागीय आयुक्तालयाने मागवला चौकशी प्रस्ताव