अंबाजोगाई : तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तर तीन ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालात दोन ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. भाजपाच्या ताब्यात असलेल्या दत्तपूर ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपाचाच झेंडा लागला आहे. धावडी ग्रामपंचायतीच्या सातपैकी चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. तीन जागांसाठी झालेल्या मतदानात ग्रामविकास पॅनेलला सर्व सात जागांवर यश मिळाले.
धावडी ग्रामपंचायतीमध्ये अनिता अंगद तरकसे, देवानंद मधुकर तरकसे, मधुकर किसनराव नेहरकर हे तिघेजण विजयी झाले असून मंगल अच्युत केंद्रे, काशिनाथ घुले, अकबर छगन शेख, अनिता रमेश चाटे हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. आंबलवाडीत शिवकांता संदीपान गर्जे, सुनंदा गोविंद गर्जे, सुमन मुरलीधर गर्जे, कोताजी लक्ष्मण दहिवाडे, जगन्नाथ व्यंकटी काळकोपरे, सिंधु व्यंकट गर्जे, पार्वती आत्माराम काळे, दत्तपूर - तुकाराम भगवान गित्ते, संध्या त्रिंबक गित्ते, नीता विकास भालेकर, उत्तम विश्वनाथ पुरी, पद्मीण सुधाकर गिरी, विजय किशोर पुरी, मनीषा यशवंत गित्ते, धावडी देवानंद मधुकर तरकसे, अनिता अंगद तरकसे, मधुकर किसन नेहरकर हे तीन विजयी झाले तर मंगल अच्युत केंद्रे, अकबर छगन शेख, अनिता रमेश चाटेे,आशा उत्तम नेहरकर हे चार जण बिनविरोध निवडून आले होते. मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विपीन पाटील, नायब तहसीलदार गणेश सरोदे व प्रकाश कुडदे यांनी काम पाहिले.
आंबलवाडीत एका जागेच्या सोडतीत राष्ट्रवादीला यश
आंबलवाडीत शिवकांता संदीपान गर्जे (राष्ट्रवादी) व जनाबाई महादेव गर्जे या दोन उमेदवारांना प्रत्येकी २७९ मते मिळाली होती. मतमोजणी झाल्यानंतर सोडत काढण्यात आली. दोन्ही उमेदवारांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्यानंतर बंद बरणीमधून सुमित अंकुश हेडे या बारा वर्षांच्या मुलाने भाग्यवान चिठ्ठी काढली. त्यात शिवकांता गर्जे या विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.