लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे पाच रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वच रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रूग्णांची संख्या पाहता जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून याठिकाणी विशेष डॉक्टर व कर्मचारीही नियूक्त केले आहेत.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यू, मलेरियाने तोंड वर काढले होते. डेंग्यूने भोपा येथे एका मुलाचा बळीही गेला आहे. आता स्वाईन फ्ल्यू ने तोंड वर काढले आहे. सध्या जिल्ह्यात पाच रूग्ण आढळले असून त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.सध्या तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. येथे विशेष डॉक्टरांची टिमही नियूक्त केली असल्याचे सांगण्यात आले.घ्यावयाची काळजीआपले नाक व तोंड रुमालाने झाकावे. शिंक आल्यास तोंड व नाक झाकून घ्यावे. आपले हात साबण व स्वच्छ पाण्याने (विशेषत: शिंक किंवा कफ काढल्यानंतर) नियमित धुवावेत. आपल्या डोळ्यांना नाकाला व तोंडाला वारंवार हात लावणे टाळावे. आजारी व्यक्तींशी जवळीक टाळावी. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. ज्यांना श्वसनाचे आजार आहेत त्यांच्याशी संपर्क टाळावा. भरपूर झोप घ्या आणि द्रव्य पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा आणि पौष्टिक आहार घ्या. आपण आजारी असाल तर आराम करावा. रुग्णांच्या संपर्कानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. घरातील हवा मोकळी राहील याची दक्षता घ्यावी, त्यासाठी खिडक्या उघडया ठेवाव्यात. आरोग्यदायी सवयींचे कटाक्षाने पालन करावे. लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. सरकारी दवाखान्यांशी संपर्क साधा.इतर फ्लू सारखीच स्वाईनची लक्षणेस्वाईन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंशापेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
‘स्वाईन फ्लू’चे बीडमध्ये पाच रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 11:48 PM
जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे पाच रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वच रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रूग्णांची संख्या पाहता जिल्हा रूग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती करून याठिकाणी विशेष डॉक्टर व कर्मचारीही नियूक्त केले आहेत.
ठळक मुद्देउपचार सुरू : जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती