कडा: आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील जुना ओढा बुजविल्याप्रकरणी १८ ऑगस्ट रोजी पाच जणांवर गुन्हा नोंद झाला. आरोपींमध्ये पोलीस अंमलदार आसाराम जगन्नाथ भगत यांचा समावेश असून ते पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत.
सांगवी पाटण येथे गट क्र. ११८ मधील
जुना ओढा खुला करण्यात यावा, यासाठी राजेंद्र अर्जुन भोसले यांनी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. स्थळपाहणी करून पंचनामा केला असता, तक्रारीत तथ्य आढळले. तहसीलदारांनी गैरअर्जदारास पूर्वीप्रमाणे ओढा करून द्यावा, असे आदेश दिले होते. मात्र, संबंधितांनी ओढा करून दिला नाही. तहसीलदार यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तलाठी भाऊसाहेब कवळे यांच्या फिर्यादीवरून सुधीर आजिनाथ भगत, पार्वती आजिनाथ भगत, आसाराम जगन्नाथ भगत, लक्ष्मण जगन्नाथ भगत, जगन्नाथ नामदेव भगत यांच्यावर आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बाबासाहेब राख करीत आहेत.