धारूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रशासकीय यंत्रणेच्या ढिल्या कारभाराची सर्वत्र चर्चा होत असताना बुधवारी शहरात तहसील, पोलीस व नगरपरिषदेने स्वतंत्रपणे कारवाई करत मोहीम राबवली. सराफा दुकानासह पाच दुकाने सील करून प्रत्येकी एक हजार पाच हजार रुपये दंड या व्यावसायिकांकडून वसूल केला.
तहसीलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक कानिफनाथ पालवे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागूल तसेच पोलीस, महसूल व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. पोलीस उपअधीक्षक भास्करराव सांवत, सहायक पोलीस निरीक्षक कानिफनाथ पालवे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. शिवाजी चौक, आडस चौकात लाॕॅकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या ४२ जणांविरुद्ध धडक कारवाई करून ८२०० रुपये दंड वसूल केला.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर. एस. कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॕॅ स्वाती डिकले यांनी पथकासह ग्रामीण भागात चौंडी, गांवदरा, आंबेवडगाव, बोडखा आदी गावांना भेटी दिल्या. प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या अंमलबजावणीची त्यांनी पाहणी केली.
===Photopath===
260521\img-20210526-wa0102_14.jpg