स्वच्छतेची मागणी
बीड : शहरातील नगर रोड परिसरात तहसील कार्यालयासमोर असलेल्या गटारी तुंबत आहेत. त्यामुळे मोठा पाऊस आल्यानंतर गटारीचे पाणी नगर रोडवर जमा होते. तसेच तहसील परिसर जलमय होतो.
मजूर शोधण्याची वेळ
धारुर : तालुक्यात सध्या सोयाबीन व कापूस काढणीस वेग आला आहे. मजुरांच्या स्थलांतरामुळे शेतात कापूस, सोयाबीन काढणीसाठी मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. तसेच इतर शेती कामे करण्यासाठीही मजुरांची शोधाशोध सुरू आहे.
नियमांची ऐशीतैसी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होते.
चोऱ्यांमध्ये वाढ
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थ रात्रभर जागून पहारा देत आहेत.