बीड : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड तालुक्यातील देव-याचीवाडी या गावाने राज्यस्तरावर बाजी मारली असून या गावाला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे. याबरोबरच बीड जिल्ह्यातील सहा गावे तालुकास्तरावर प्रथम आली आहेत.पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा २०१९ च्या तालुका व राज्यस्तरीय पारितोषिकांचे वितरण रविवारी पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाले. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील आनोरे (ता. अंमळनेर), वाशिम जिल्ह्यातील बोरव्हा खुर्द (ता. मंगरूळ पीर) आणि बीड जिल्ह्यातील देवºयाची वाडी (ता. बीड ) या गावांना राज्य पातळीवरील तिसरे पारितोषिक मिळाले. संयुक्तपणे ४० लाख रूपये व प्रमाणपत्र असे या पारितोषकाचे स्वरूप आहे. तसेच बीड जिल्ह्यातील गिरवली आपेट (ता. अंबाजोगाई), सराटेवडगाव (ता. आष्टी), नामेवाडी (ता. केज), मोठेवाडी (ता. धारूर), सरफराजपूर (ता. परळी), आणि मांडवखेल (ता. बीड) या सहा गावांना तालुकास्तरावरील पहिले पारितोषिक मिळाले आहे.चौथ्या वॉटर कप स्पर्धेत बीड जिल्ह्यातील ६ तालुक्यांचा समावेश होता. बीड तालुक्याचा प्रथमच या स्पर्धेत सहभाग असताना तालुक्यातील देवºयाची वाडी या गावाने उत्कृष्ट काम करून राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १५ गावांची निवड झाली होती. केलेल्या श्रमदानामुळे गावे दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करतीलच मात्र वॉटर कप पुरस्कारामुळे गावाच्या विकासाला नवा आकार मिळणार आहे.तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणेबीड - देवºयाची वाडी (प्रथम) मांडाखेल (द्वितीय), गुंदेवाडी (तृतीय), आष्टी - सराटे वडगाव, पांगुळ, शेरी बु., धारुर - मोठेवाडी, मोरफळी, सोनीमोहा, केज - नामेवाडी, पाथरा, आवसगाव, परळी - सरफराजपूर, गोपाळपूर, संगम, अंबाजोगाई-गिरवली आपेट, ममदापूर, धानोराग्रामस्थांच्या एकजुटीचे यशस्पर्धेत जरी तिसरा क्र मांक पटकावला असला तरी वितरणावेळी मात्र पहिला बहुमान मिळाला. या यशाचा आनंद ग्रामस्थांनी गावात ढोलताशे व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी एकजूट होऊन दुष्काळावर मात करण्यासाठी प्रचंड मेहनतीने श्रमदान केले. यामध्ये गावातील आबालवृद्ध तसेच महिलांनी मोठया संख्येने सहभागी होऊन श्रमदान केल्याने गावाचा महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक आला. हा सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे संभाजी सुर्वे म्हणाले.
देवऱ्याची वाडीचा राज्यात झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:37 PM
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत बीड तालुक्यातील देव-याचीवाडी या गावाने राज्यस्तरावर बाजी मारली असून या गावाला तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले आहे.
ठळक मुद्देपाणी फाऊंडेशनच्या ‘वॉटर कप’चे तिसरे बक्षीस : बीड जिल्ह्यातील ६ गावे ठरली तालुकास्तरीय विजेती