शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले; साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 1:18 PM

जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. 

- संजय खाकरेपरळी: गेल्या दोन दिवसापासून संततधार व मुसळधार पाऊस चालू असल्याने . सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीच्या पात्राला पूर आला आहे. या नदीचे पाणी आंबेवेस भागातील पुलावरून वाहू लागले. हे पाणी शहरातील बरकत नगर, इंदिरानगर, भिमानगर , कृष्णा नगर, गोपाल टॉकीज रोड,आंबेवेस , रहेमत नगर, गंगासागर नगर, कुरेशी नगर, भुई गल्ली, सिद्धार्थ नगर, सर्वे नंबर ७५ मधील घरात आज मंगळवारी पहाटे ५ वाजता  पाणी शिरले आहे.

जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. या भागातील घरात चार फूट पाणी साचले. अनेकांच्या घरात चिखल झाला आहे.यामुळे या भागात हाहाकार माजला. पहाटे साडेपाच वाजता परळी चे उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर,नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, नगरपालिका मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे, उपमुख्य अधिकारी संतोष रोडे, नगर अभियंता ज्ञानेश्वर ढवळे , अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन स्वच्छता  विभागाचे शंकर साळवे, सुनील आदोडे यांनी भेट देवून पाहणी केली . व मदत कार्य केले. नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली आहे. नाल्यात साचलेला कचरा काढण्यासाठी जेसीबीच्या दोन मशीन लावण्यात आल्या आहेत. 

सकाळी ११ वाजेपर्यंत प्रशासनातील अधिकारी थांबून नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचना केल्या व  नगरपालिकेने नऊ ठिकाणी राहण्याची तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केली आहे. तसेच या भागात प्रा टीपी मुंडे, माजी उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, आयुब पठाण, इस्माईल पटेल , माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, अॅड. जीवनराव देशमुख, देवराव लुगडे, सुरेश नानावटे यांनी भेटी देऊन मदत कार्य केले.

मुसळधार पावसामुळे परळीतील सरस्वती नदीच्या पात्रात पूर आल्याने १००० कुटुंबाच्या घरात पाणी शिरले आहे. प्रशासनाने तातडीने भेट देऊन या भागातील नागरिकांना नऊ ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन केले तसेच या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करण्यासाठी एक पथक नेमण्यात आले या पथकात तलाठी नगरपालिका कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी असतील अशी माहिती परळी उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली. 

परळी नगरपालिकेच्या वतीने पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे असे परळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी सांगितले. पूरग्रस्त भागातील लोकांना निवाऱ्याची सोय परळीतील  शाही फंक्शन हॉल बरकत नगर ,मिलिया स्कूल, बागवान शादी खाना, जिल्हा परिषद शाळा बरकत नगर ,समाज मंदिर ,भीमानगर , झमझम पार्क इर्शाद नगर, कुरेशी शादी खाना या ठिकाणी करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली प्रा टीपी मुंडे, प्रा विजय मुंडे, प्रदीप मुंडे भीमराव मुंडे व इतर कार्यकर्त्यांनी भेट देऊन त्या लोकांच्या खिचडीची सोय केली. 

बरकत नगर भागात अनेकांच्या घरात पहाटे पाच वाजता पाणी घुसले हे समजताच आपण तिथे गेलो. तेथील लोकांना एका हॉलमध्ये थांबण्याची विनंती केली व त्या ठिकाणी काही लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. - आयुब पठाण, माजी उपनगराध्यक्ष 

कृष्णा नगर, गंगासागर नगर , बरकत नगर  या भागातील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने दानादान उडाली. नुकसानग्रस्त भागातील लोकांसाठी सकाळी त नाष्ट्याची सोय करण्यात आली ,घरपोच नाष्टा देण्यात आला व या ठिकाणी स्टॉल लावून नाश्त्याची सोय केली.- दीपक देशमुख, माजी नगराध्यक्ष 

टॅग्स :BeedबीडRainपाऊस