बीड : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रबी दोन्ही हंगामात मिळून होणारी चारा निर्मिती यावर्षी झाली नाही. तर जिल्ह्यातील चारा संपून १० दिवस उलटले आहेत. जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत चारा छावणी प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याने चारा-पाण्याविना पशुधनाची परवड होत आहे.जिल्ह्यात जवळपास १२ लाख इतके पशुधन आहे. त्यासाठी रोज पाच हजार मेट्रीक टन चारा लागतो. पशुसंवर्धन विभागाने डिसेंबरमध्ये ३२ दिवस पूरेल एवढाच चारा शिल्लक असल्याचे अहवालात म्हटले होते. मात्र आज घडीला जिल्ह्यात चारा शिल्लक नसून परजिल्ह्यामधून चारा खरेदी करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी मागणी आल्यानंतर चारा छावण्या जिल्ह्यात सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र प्रत्येक तालुक्यातून छावण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रस्ताव तहसील कार्यालयात आले. १५ दिवस उलटून देखील चारा छावण्यांच्या प्रस्तावावर निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. दरम्यान, बीडमध्ये ६ फेब्रुवारी रोजी आलेल्या मागण्यांचा विचार करता छावण्यांबाबत एक- दोन दिवसात सुधारित निर्णय शासनाकडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पाण्याचा प्रश्न देखील गंभीरजिल्ह्यातील पशुधन गाय-म्हैस वर्ग, शेळी, मेंढी व इतर जवळपास १२ लाख आहे, मोठ्या जनावरांना प्रतिदिन ४०-४५ लिटर पाणी लागते तर लहान जनावरांना १५ ते १८ लिटर व शेळ््या, मेंढ्यांना ५ लिटर पाणी लागते या हिशेबाने रोज जवळपास २ कोटी ८८ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. बहुतांश गावांध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पुढील काळात पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे.
चारा संपून दहा दिवस उलटले; अद्याप छावण्यांचा निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:39 PM
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप व रबी दोन्ही हंगामात मिळून होणारी चारा निर्मिती यावर्षी झाली नाही. तर जिल्ह्यातील चारा संपून १० दिवस उलटले आहेत.
ठळक मुद्देपशुधनाचे हाल : पावणेतीन कोटी लिटर पाणी लागते रोज, चारा निर्मिती घटणार