धारूर शहरात ‘ब्रेक द चेन’ नियमावलीचे उल्लंघन होऊ नये, याकडे नगर परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी धारूर युथ क्लबकडून मुख्याधिकारी यांना निवेदन आले व याचे काटेकोर पालन करण्याची मागणी करण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये ब्रेक द चेन नियमावली जाहीर केली आहे; परंतु शहरामध्ये भाजीपाला विक्रेते आपल्या सोयीनुसार शहरामध्ये ज्या ठिकाणी सतत नागरिकांची रहदारी असणाऱ्या रस्त्यावर भाजीपाला विक्री करताना दिसत आहेत. यामुळे अशा ठिकाणी गर्दी वाढू शकते व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास अपयश येऊ शकते. ही बाब धारूर युथ क्लबच्या पदाधिकारी यांनी नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. भाजीपाला विक्रेत्यांना नगर परिषदेने ठरवून दिलेल्या भाजी मार्केटमध्येच भाजीपाला विकी करावा व वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यास प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे, असे युथ क्लबचे अध्यक्ष गौतम शेडगे, सुरेश शिनगारे, विजय शिनगारे, सूर्यकांत जगताप यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन वेळीच खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.