बीड : फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महापुरुषांना आपापल्या समाजात बंदीस्त न करता त्यांचे विचार बहुजनांनी व समाजातील सर्व स्तरातील विचारी बंधू-भगिनींनी पक्के लक्षात ठेवून, तसे आचरण करणे महत्त्वाचे आहे. त्यातच सर्वांचे हित आहे, असे प्रतिपादन मराठा क्रांती मोर्चाचे संघटक तथा सीए बी.बी. जाधव यांनी केले.
से.नि.ब.अ.क.महासंघ बीड व महामानव अभिवादन ग्रुपने वीरमाता जिजाऊ मासाहेब स्मृतीदिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी बी.बी. जाधव व वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे, नगरसेवक सुभाष सपकाळ यांनी राष्ट्रमाता जिजाऊंना पुष्पमाला अर्पण करून दीपधुपाने अभिवादन केले. उपस्थितांनी पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली.
महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष उपासक जी.एम.भोले यांनी मनोगत व्यक्त केेले.
प्रास्ताविक प्रशांत वासनिक यांनी केले. कार्यक्रमास प्रा.अॅड. अशोक गायकवाड, इंजि.नवनाथ पोटभरे, संजय वाघमारे व से.नि.ब.अ.क. महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी आभार मानले.
===Photopath===
170621\285417_2_bed_17_17062021_14.jpg
===Caption===
जिजाऊ अभिवादन