लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अद्यापही आटोक्यात आलेली नाही. बाधितांवर ज्या रुग्णालयात उपचार केले जातात, तेथेच नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे समोर आले आहे. असे असेल तर तिसरी लाट रोखणार कशी? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे, परंतु त्यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांचा लोंढा मोठा आहे. प्रवेशद्वारावर असणारे सुरक्षारक्षक केवळ बघ्याची भूमिका घेतात. तर आतमध्येही काही डॉक्टर, कर्मचारी रुग्णांकडे दुर्लक्ष करत असल्याने नातेवाईक अविश्वास दाखवित आत जाण्याचा हट्ट धरतात. काही डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे.
ओपीडीमध्येही असते गर्दी
n जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित व संशयितांना तपासणीसाठी फिवर क्लिनिक तयार केले आहे.
n येथे सध्या रुग्ण कमी झाल्याने गर्दी कमी असते, परंतु स्थलांतरित रुग्णालयात गर्दी कायम असते.
n याच गर्दीत काही बाधित रुग्णही असतात. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी साथरोगांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. खासगी रुग्णालयांसह सरकारीमध्येही गर्दी होत आहे.
रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नये...
कोरोना वॉर्डात नातेवाईक जाऊन बिनधास्त बाहेर फिरतात. विशेष म्हणजे रुग्णही बाहेर फिरल्याचे प्रकार घडले होते. येथून कोरोनामुक्त होऊन जाण्याऐवजी हेच सुपर स्प्रेडर ठरण्याची भीती आहे.
सहकार्य करावे
कोरोना अद्याप गेलेला नाही. सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना वॉर्डमध्ये अति गंभीर रुग्णांसाठीच केअर टेकर म्हणून एक नातेवाईक ठेवतो. इतरांना बाहेर काढले जाते. सुरक्षा रक्षकांनाही तशा सूचना केलेल्या आहेत. नातेवाईकांनीही सहकार्य करावे.
- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक बीड
010921\01_2_bed_19_01092021_14.jpg~010921\01_2_bed_18_01092021_14.jpg
जिल्हा रूग्णालयात बुधवारी अपंगांचा बोर्ड होता. ३ क्रमांकाच्या विभागासमोर दिव्यांग व्यक्ती बसलेले होते. जागा अपुरी असल्याने त्यांनी या ठिकाणी गर्दी केली. येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसले. बसण्याची सोय करावी, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.~जिल्हा रूग्णालयात कोरोना वॉर्डमध्ये व या परिसरात फिरणारे लोक सर्रासपणे मास्क अनुवटीला लावून फिरताना दिसतात. विशेष म्हणजे यात डॉक्टर, परिचारीका, इतर कर्मचारी व पत्रकारांचाही समावेश असतो. नियम दाखविणारेच नियम तोडतात.