शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

सलग तिसऱ्या दिवशी वैद्यनाथच्या दर्शनासाठी भाविकांचे गर्दी उसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 5:26 PM

मंदिर परिसराला आले जत्रेचे स्वरूप; सलग तीन दिवासापासून भाविकांच्या रांगा

- संजय खाकरेपरळी( बीड): देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सोमवारी राज्य व परराज्यातील भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. हर हर महादेवच्या जयघोष करीत भाविकांनी रांगेत थांबून शांततेत दर्शन घेतले. आज गेल्या दोन दिवासापेक्षा अधिक गर्दी झाल्याने मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मंदिर परिसरातील बेलफुल, प्रसाद साहित्य व खेळणीच्या दुकानात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.

अधिक मासात भाविकांची संख्या वाढली आहे. शनिवार पाठोपाठ रविवारी व सोमवारी ही श्री वैद्यनाथ मंदिरात भक्तांची रीघ लागली होती. सकाळपासून रात्रीपर्यंत भाविकांची गर्दी होती. धर्मदर्शन व पासधारक अशा दोन रांगा लागल्या होत्या, धर्मदर्शनच्या रांगेत सकाळी 3 तासांनी दर्शन झाले असे नागापुराचे भाविक मनोज यस्के  यांनी सांगितले. रविवारी राजस्थान येथील 65 भाविकांनी श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याचे एका भाविकांनी सांगितले. 

तसेच महाराष्ट्रातील नागपूर, जळगाव व अन्य ठिकाणावरून तसेच इतर राज्यातील  व पर राज्यातील भाविकांच्या गर्दीने रविवारी, सोमवारी वैद्यनाथ मंदिर फुलले होते. रविवारी सकाळी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त राजेश देशमुख यांना स्वतः मंदिर गाभाऱ्यात थांबून दर्शन व्यवस्था सुरळीत करावी लागली.

अधिकमासामुळे दर्शनासाठी राज्य व परराज्यातील भाविकांची गर्दी वाढली आहे. शनिवारी, रविवारी व सोमवारी तर भाविकांची मोठी गर्दी श्री वैद्यनाथ मंदिरात झाली होती.- प्रा. बाबासाहेब वामनराव देशमुख, सचिव, श्रीवैजनाथ देवस्थान ट्रस्ट

टॅग्स :spiritualअध्यात्मिकBeedबीड