शिरुर कासार : तालुक्यातील दुष्काळाचे नको तेवढे सहन केलेले दु:ख बाजूला ठेवून शेतकरी राजा पुन्हा शेतमेहनत करून हंगामपूर्व कामात व्यस्त होत असल्याचे दिसून येत आहे.नांगरट करून तापलेल्या जमिनीवर आता मोघडणी, पाळी घालून घरी असलेले शेणखत शेतात टाकू लागला, तर महिला उन्हाची पर्वा न करता ढिगारे शेतात विखरून टाकण्याचे काम करीत आहेत.दिस जातील, दिस येतील, या न्यायाने पाऊस पडेल, दुष्काळ जाईल, आपण आपले काम उरकून घ्यावे, या भावनेतुन आता दुष्काळ दु:ख उगाळीत बसण्यापेक्षा हंगामपूर्व कामाची लगबग सुरू आहे. घरातील पुरूष छावणीवर गुंतला असल्याने शेताकडे महिला शेतकरी लक्ष देऊ लागल्या आहेत. एकीकडे शहरी व अन्य सुखवस्तू महिला उन्हामुळे कुलर, फॅनच्या हवेतला बसत असल्या तरी शेतकरी महिला मात्र काळ्या आईच्या सेवेत मग्न आहे.
दुष्काळाचे दु:ख विसरुन शेतकरी हंगामपूर्व कामांमध्ये झाले मग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:14 AM
तालुक्यातील दुष्काळाचे नको तेवढे सहन केलेले दु:ख बाजूला ठेवून शेतकरी राजा पुन्हा शेतमेहनत करून हंगामपूर्व कामात व्यस्त होत असल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देभर उन्हात शेणखत शेतात विखरून टाकतात महिला