वंचित बहुजन आघाडीची मागणी
अंबाजोगाई : कोरोनाच्या काळातील अंबाजोगाई शहरवासीयांची घरपट्टी व नळपट्टी माफ करा, या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबाजोगाई शहरातील नागरिकांची कोविडच्या कालावधीतील घरपट्टी व नळपट्टी माफ करावी, या मागणीचे निवेदन देण्यात आले. तसेच सफाई कर्मचारी सुदामती वाघमारे यांचे कोविड आजाराने नगर परिषदेत कर्तव्य बजावत असताना निधन झाले. त्यांना प्रशासनाने मदत करावी. कोरोनाच्या काळात अनेक नागरिकांना रोजगार उपलब्ध नव्हता तर अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याने व उपचारावर मोठा खर्च झाल्याने नागरिक आर्थिक संकटात आहेत. याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच ज्या निराधारांचे अनुदान रखडले आहे. ते त्यांना देण्यात यावे, अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा ही देण्यात आला आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी प्रकाश वेदपाठक, सुशांत धावरे, गोविंद मस्के, सतीश सोनवणे, उमेश शिंदे, बालासाहेब मस्के, प्रा. सुमित वाघमारे, सचिन भगवान वाघमारे, प्रवीण शिंदे यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.