शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
4
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
5
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
6
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
7
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
9
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
10
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
11
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
12
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
13
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
14
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
15
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
16
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
18
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
19
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
20
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?

आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी बीडमधील भाजपचा माजी पदाधिकारी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 3:33 PM

health department paper leak case पुणे पोलिसांची कारवाई, चौकशीला म्हणून बोलावले अन् ताब्यात घेतले

- सोमनाथ खताळबीड : आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात (health department paper leak case) बीडमधील भारतीय जनता ( BJP ) युवा मोर्चाचा माजी पदाधिकारी संजय सानप याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीसाठी पुण्यात गेल्यावर त्याचा सहभाग आढळल्याने पुणे सायबर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आता या प्रकरणात आरोपींची संख्या १८ झाली आहे. संजयच्या संपर्कात असलेले आणखी सहा जण रडारवर असल्याचे समजते.

३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभागाची गट ड परीक्षेचा पेपर फुटला होता. यात मास्टरमाईंड असलेले लातूरचे उपसंचालक कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, आरोग्य अभियानचा सहसंचालक डॉ. महेश बोटले यांच्यासह १७ जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत. यात बीडमधील रहिवाशी असलेल्या ७ लोकांचा समावेश आहे. आता आठवा संजय सानपही जाळ्यात अडकला आहे. त्याला या प्रकरणात चौकशीसाठी पुण्याला बोलावले होते. यात अगोदरचा आरोपी असलेला राजेंद्र सानप याच्या संपर्कात राहून काही पुरावे हाती लागल्याने संजयलाही सोमवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढत चालली असून, यात आता पुढचा क्रमांक कोणाचा, याकडे लक्ष लागले आहे.

'न्यासा' कंपनीही संशयाच्या भोवऱ्यातटीईटी परीक्षेत जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा महाराष्ट्र संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याचा सहभाग आढळला होता. तसाच सहभाग आता आरोग्य विभाग भरतीचे कंत्राट दिलेल्या न्यासाचाही असण्याची शक्यता आहे. न्यासा कंपनीचे दोन लोक बीडमध्ये गट क व ड चा पेपर घेऊन आल्याची चर्चा आहे. नगर रोडवरील एक व अंबिका चौकातील कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयात त्यांनी शाळा भरवून प्रश्नांची उत्तरे सांगितल्याची चर्चा आहे.

वाद घालणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी रडारवरजिल्ह्यातील संशय असलेले तीन कर्मचारी रजेवर गेले आहेत. यात पाटोदा तालुक्यातील एका आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वीच आपल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत वाद घातला होता. पेपर फुटण्याच्या काही दिवस अगोदर या डॉक्टरसोबत झालेले संभाषण पुरावा म्हणून ताब्यात घेणार आहेत. याच कर्मचाऱ्याने वैद्यकीय अधिकाऱ्यालाही अडचणीत आणले असून, त्यांनाही ताब्यात घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. रविवारी पुणे पोलिस वैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती घेऊन व वडझरीला येऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

संजय सानप हा चौकशीसाठी पुण्यातच होता. राजेंद्र सानप सोबतचा संवाद आणि इतर काही पुरावे मिळाल्याने त्याला अटक केली आहे.- डी. एस. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीexamपरीक्षा