माणिक त्रिंबक सिरसाट (४७) असे त्या आरोपीचे नाव आहे. सोनीजवळा येथील एका महिलेच्या अंगावर गुंगीचे औषध टाकून तिच्याजवळील नगदी रक्कम साळेगावच्या आठवडी बाजारातून पळवली होती. तसेच भाटुंबा येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याला साळेगाव येथून तुम्हाला केजला सोडतो असे म्हणत नंतर तुमची सरकारी पगार चालू करतो असे सांगून त्या खात्यावरील हजारो रुपयांची रक्कम लुबाडली होती. त्यानंतर त्याला अटक करून सुटका झाल्यानंतर काही काही दिवसांनीच कोरेगाव येथील एका वृद्धालाही पिसेगाव शिवारात गुंगीचे औषध देऊन लुटले होते.
त्यानंतर पुन्हा टाकळी येथील सेवानिवृत्त शिक्षकाला ही गुंगीचे औषध देऊन त्याच्याजवळील नगदी रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला होता. अखेर डीबी पथकाचे दिलीप गित्ते यांनी १२ सप्टेंबर रोजी माणिक सिरसाट यास आरणगावातून अटक केली होती. त्यास १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.