जिल्ह्यात शुक्रवारी जिल्ह्यात ४ हजार ३९८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यातील ३ हजार २०३ जण निगेटिव्ह आले, तर १ हजार १९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १९४, आष्टी २०१, बीड २०८, धारुर ५०, गेवराई १२४, केज १३०, माजलगाव ५९, परळी ७२, पाटोदा ६५, शिरुर ५८ व वडवणी तालुक्यातील ३४ जणांचा समावेश आहे. दिवसभरात ८९९जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली.
दरम्यान, शनिवारी चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात धनगरजवळका (ता. पाटोदा) येथील ३० वर्षीय पुरुष, नेकनूर (ता. बीड) येथील ६० वर्षीय पुरुष, ममदापूर (ता. परळी) येथील ६० वर्षीय महिला आणि गणेशपार परळी येथील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ४६ हजार ५५ इतकी असून, यापैकी ३९ हजार ५८३ जणांनी कोरोनावर मात केली, तर एकूण बळींचा आकडा ८२४ झाला आहे. ही माहिती जि. प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.