नागापूर ग्रामपंचायतीच्या वतीने काळजी घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे. नागापूर गावात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना आजाराची लागण सुरू झाली आहे. गावात एक दिवसाआड पाच रुग्ण कोरोना बाधित होत असल्याचे पुढे आले आहे. त्यातच बुधवारी चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागापूर गावात ग्रामपंचायतच्या वतीने यापूर्वी दोन वेळा जंतुनाशक औषधांची फवारणी केली आहे. तसेच प्रत्येकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच ग्रामस्थांना एक हजार मास्कचे वाटप करण्यात येणार असून सॅनिटायझर ग्रामपंचायतच्या वतीने दिले जाणार आहे, अशी माहिती नागापूरचे सरपंच मोहन सोळुंके यांनी दिली. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहनही ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
नागापूर येथे एका दिवसात चौघा जणांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. गावातील ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लस देणे सुरू आहे. अँटीजण टेस्ट चालू आहेत. ग्रामस्थांनी मास्क वापरावे, व नियमाचे पालन करावे
- डॉ लक्ष्मण मोरे,तालुका आरोग्य अधिकारी