- पुरूषोत्तम करवा माजलगाव (बीड ) : येथील खैरुल्ला खान हे आपल्या कुटुंबियासह ओमन देशातील झालेल्या ढगफुटीत शनिवारी बेपत्ता झाले होते. तब्बल ६० तासाच्या तपासा नंतर घटना स्थळापासुन २२ कि.मी.आंतरावर खान कुटुंबातील सहाना पैकी चार जनांचे प्रेत सापडले असुन खैरुल्ला खान व २२ दिवसीय चिमुकला अदयाप बेपत्ता आसल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
ओमन देशात नोकरीला असलेल्या आपल्या मुलाला मुलगा झाला आहे. म्हणुन भेटण्यासाठी गेलेल्या माजलगाव येथील खैरुल्ला खान आपल्या पत्नी सह ६ मे रोजी गेले होते.व तेथील पर्याटन स्थळ पाहाण्यासाठी मुलगा ,सुन , पत्नी व तिन नातवासोबत १८ मे रोजी भारतीय वेळे नुसार रात्री ७ वाजता वादी बीन खालीद या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी अचानक ढगफुटी झाल्याने आलेल्या महापुरात खैरुला खान सह कुटुंबातील ६ जन बेपत्ता झाले तर सुदैवाने त्यांचा मुलगा सरदार खान एका झाडाच्या फांदीचा आधार घेत बचावला या घटनेची वार्ता माजलगाव ला समजताच त्यांच्या निवास स्थानी नातेवाईकासह हितचिंतकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.आसता या घटनेमुळे परिसरात हाळहाळ व्यक्त होत आहे.
बचाव मदत कार्य करणाऱ्या पथकास तब्बल ६० तासानंतर घटनास्थळा पासुन २२ कि.मी.अंतरावर इब्रा येथे पुरात साचलेल्या गाळात काही प्रेत आढळून आली. तपासानंतर अन्य प्रेतांसोबत माजलगाव येथील खान कुटुंबियांमधील चार प्रेत मंगळवारी पहाटे अडीच वाजता सापडले आहेत तर खैरुल्ला खान व २२ दिवसाचा चिमुकला नातु अद्याप बेपत्ताच असुन या ठिकाणचे हवामान खराब असल्याने शोध कार्यास अडथळे येत असल्याचे खान कुटुंबियांच्या नातेवाईकांनी सांगितले.