शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

चार महिन्यांनंतर जाणवला पावसाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 11:36 PM

रविवारी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे समाधान व्यक्त होत असून चार महिन्यानंतर आनंदाचे डोही आनंदाचे तरंग जाणवू लागले आहे.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : बंधारे, नद्यांना पाणी; परतीच्या पावसाने समाधान; सातपुते वस्तीवर वीज कोसळून घोडा ठार

बीड : रविवारी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे समाधान व्यक्त होत असून चार महिन्यानंतर आनंदाचे डोही आनंदाचे तरंग जाणवू लागले आहे. सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण होते, त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. दुपारपासून जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. गेवराईत दीड तास चांगला पाऊस झाला. धारुर, केज, वडवणी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. शिरुर कासार तालुक्यातील रूप्पुर, गोमळवाडा, वारणी भागात पाऊस झाला. बंडाळ्याच्या ओढ्याला आलेले पाणी सिध्देश्वर बंधाऱ्यात पोहचले. पिंळनेर परिसरातील रिद्धीसिद्धी नदीला पाणी आले, तर मांजरसुंभा, चौसाळा, पालसिंगण परिसरातही चांगला पाऊस झाला.येल्डा येथे वीज कोसळलीअंबाजोगाई तालुक्यातील येल्डा परिसरातील सातपुते वस्तीवर रविवारी कानिकनाथ शंकर सातपुते हे परिसरातील माळावर मेंढ्या चारत होते. त्यासोबतच त्यांच्या मालकीचा घोडाही चरत होता. त्यांच्याच शेजारी भगवान सातपुते यांचीही जनावरे चरण्यासाठी सोडलेली होती. दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान अचानक गरजण्याचा आवाज झाला अंगावरच वीज कोसळल्याने घोडा जागीच ठार झाला. सुदैवाने कानिकनाथ व भगवान हे दोघे घटनेपासून शंभर फूट अंतरावर होते. त्यांच्यासमोर ही वीज कोसळली. विजेच्या धक्क्याने काही क्षण या दोघांच्या डोळ्यांसमोर काळोख झाला. अंधारी गेल्यावर पाहिले तर घोडा मरण पावलेला होता, असे भगवान सातपुते यांनी सांगितले. इतर जनावरे मात्र सुरक्षित राहिली. या घटनेमुळे कानिकनाथ यांचे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, या घटनेची माहिती तलाठी व गावच्या सरपंचाना दिली होती. परंतू सायंकाळपर्यंत पंचनामा झालेला नव्हता.सिद्धेश्वर बंधारा भरला : कापरी नदीला पूरपाणी टंचाई हे सातत्याचे समिकरण असलेल्या शिरूर शहराला रविवारी आनंदाची वार्ता पावसाने दिली. शहराजवळ असलेला सिध्देश्वर बंधारा भरला तर कापरी नदी देखील भरून गेल्याने चांगला दिलासा मिळाला. रविवारी कालिका देवी मंदिरात अष्टमीचा होमहवन विधी होऊन पुर्णाहुती झाली. त्याचबरोबर बंधारा देखील भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.गेली वर्षभर टॅकरवर शहर विसंबुन होते सतत पाऊस धरसोड करत होता ,बंधारा आणि मध्यम प्रकल्प यावर्षी भरण्याची आशा धुसर झाली होती. पाणी टंचाई समस्या निर्माण होते किंवा काय अशी शंका वाटू लागली असतानाच रविवारी प्रथमच सिध्देश्वर बंधारा भरल्याने आता सिंदफणा व उथळा मध्यमप्रकल्प देखील भरतील अशी आशा लागली आहे .

टॅग्स :BeedबीडRainपाऊस