बीड : जागा वाटणीवरुन घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी दाखल प्रकरणात एकाच कुटुंबातील चौघांना दोन वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायदंडाधिकारी रोहिणी बोंद्रे यांच्या न्यायालयाने सुनावली.बीडच्या शुक्रवार पेठ भागातील चंद्रकांत शिंदे, पत्नी प्रमिला, वडील अर्जुन व आई अनूसयाबाई हे ४ जुलै २०१३ रोजी त्यांच्या घरात जेवण करुन बसले असता चंद्रकांत यांची बहिण आशाबाई रणखांब, पती गहिनीनाथ, मुले प्रवीण व शैलेश यांनी जागा वाटून देत नसल्याच्या कारणावरुन घरात घुसून चौघांना मारहाण केली. या प्रकरणी चंद्रकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरुन पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला. त्यामुळे शिंदे यांनी न्यायालयात खाजगी फौजदारी प्रकरण दाखल केले. या प्रकरणी अॅड. बी. ए. कदम यांनी फिर्यादी शिंदे यांच्या वतीने बाजू मांडली. चार साक्षीदार तपासून न्यायालयापुढे भक्कम पुरावा आणला.गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायदंडाधिकारी रोहिणी बोंद्रे यांच्या न्यायालयाने प्रवीण रणखांब, शैलेश रणखांब, गहिनीनाथ रणखांब, आशाबाई रणखांब यांना दोन वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मारहाण प्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांना दोन वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:22 PM
जागा वाटणीवरुन घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी दाखल प्रकरणात एकाच कुटुंबातील चौघांना दोन वर्षे सश्रम कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायदंडाधिकारी रोहिणी बोंद्रे यांच्या न्यायालयाने सुनावली.
ठळक मुद्देजागा वाटणीचे होते भांडण : बीडमधील प्रकरण