बीड : सिंदफणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून त्याची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टर, एक जेसीबीसह तीन ब्रास वाळू असा एकूण ५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी पहाटे पोलीस अधीक्षक पथकाचे सपोनि. विलास हजारे यांनी ही कारवाई आडगाव येथील सिंदफणा नदीपात्रात केली.
पिंपळनेरपासून जवळच असलेल्या आडगाव येथील सिंदफणा नदीपात्रात गुरुवारी पहाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांनी सहकाऱ्यांसह कारवाई करून एक जेसीबी ४ टॅक्टर आणि तीन ब्रास वाळू असा ५६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी प्रभाकर देवडकर, बाळू बनगर, अंगद परिनकर (रा. आडगाव) आणि अशोक आबूज (रा.रांजेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अंगद परिनकर व अशोक आबूज हे दोघे फरार असून त्यांचा तपास सुरू आहे.