शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

शिवसंग्रामचा चौथा सदस्यही भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:47 PM

जिल्ह्यातील भाजप आणि शिवसंग्राममधील राजकीय वादात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आ. विनायक मेटे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

ठळक मुद्देमहाजनादेश यात्रेतील ‘नाराजी’ : पंकजा मुंडेंचा विनायक मेटेंना धक्का

बीड : जिल्ह्यातील भाजप आणि शिवसंग्राममधील राजकीय वादात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आ. विनायक मेटे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसंग्रामच्या तिकीटावर निवडून आलेले नेकनूरचे जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी गुरुवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यापुर्वी तीन जि.प.सदस्य भाजपाच्या गळाला लागले होते. उरलेला एकमेव सदस्य देखील भाजपात गेल्यामुळे बीडजिल्हा परिषदेत शिवसंग्रामची सदस्य संख्या चारवरून शुन्यावर आली आहे.बीड जिल्ह्यात आ.विनायक मेटेंनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी राजकीय वैर लोकसभा निवडणुकीपुर्वीच घेतले होते. यामध्ये महाजनादेश यात्रेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा आक्षेप असताना देखील मुख्यमंत्र्यांनी आ.मेटे यांचा सत्कार स्वीकारला होता. त्यादिवशी झालेल्या वादंगामुळे हा वाद आणखीनच चिघळला होता. महाजनादेश यात्रेच्या जाहीर कार्यक्रमात विनायक मेटे यांच्यावर टीका करण्यात आली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांचा सत्कार करुन पंकजा मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आ. मेटे यांनी केला होता. त्याला मंत्री पंकजा मुंडेंनी प्रत्युत्तर देत विनायक मेटेंचा उरलेला एकमेव जिल्हा परिषद सदस्य देखील भाजपात घेतला आहे.नेकनूर जि. प. गटाचे सदस्य भारत काळे यांनी गुरुवारी शिवसंग्रामची साथ सोडत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर पार पडला. यावेळी आ. सुरेश धस, राजेंद्र मस्के, विजयकांत मुंडे यांची देखील उपस्थिती होती. या प्रवेशामुळे शिवसंग्राम पक्षाला मुंडे यांनी चांगलाच धक्का दिल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु आहे. यामुळे पुढील काळात आ. विनायक मेटे हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष देखील लागले आहे.अडीच वर्षातच शिवसंग्रामचे चारही जि.प. सदस्य भाजपातबीड जिल्हा परिषदमध्ये अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसंग्रामचे ४ सदस्य निवडून आले होते.यापुर्वीच शिवसंग्रामचे तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी शिवसंग्रामला सोडचिठ्ठी दिली होती.राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जयश्री मस्के या बीड जि. प. च्या उपाध्यक्ष आहेत.मस्केंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आ. मेटे यांनी जिल्हा परीषदेच्या सत्तेतून बाहेर पडत पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये भाजपसोबत न राहण्याचा निर्णय मेटे यांनी घेतला व राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देण्याची घोषणा केली होती.त्यानंतर चौसाळा सर्कलचे जि.प.सदस्य अशोक लोढा आणि विडा सर्कल विजयकांत मुंडे या दोन जिल्हा परिषद सदस्यांनी यापूर्वीच भाजपात प्रवेश केला होता.आता उरलेले एकमेव भारत काळे यांनिही भाजपात प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेत शिवसंग्रामचे संख्याबळ शुन्यावर आले आहे.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदPankaja Mundeपंकजा मुंडेVinayak Meteविनायक मेटे