लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वाढत्या डोळ्यांच्या आजाराबाबत सर्वसामान्यांना उपचार मिळावा, आवश्यक नेत्र तपासणी व्हाव्यात, या उद्देशातून शहरातील माँ वैष्णवी पॅलेस येथे दृष्टिदाते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व तज्ज्ञ टीमच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी शिबीर १८ आॅगस्ट रोजी शिवसंग्रामच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात नेत्र तपासणीनंतर आवश्यक असणाऱ्या रुग्णांना मोफत औषधोपचार, चष्मा वाटप, शस्त्रक्रि या आवश्यक असल्यास शिवसंग्रामतर्फे मुंबई येथे करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ बीड तालुक्यासह जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा, असे आवाहन शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ. विनायक मेटे यांच्याकडून करण्यात आले आहे.शिवसंग्रामकडून सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येते. व्यसनमुक्ती, स्वछता अभियान, महिला सक्षमीकरण, रोजगार मेळावे आदी उपक्र मांसह आता शिवसंग्रामकडून भव्य अशा मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर उद्या दि १८ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालेल.शिबिरात सहभागी झालेल्यांची नेत्रतपासणी होणार आहे. आवश्यक असेल तर संबंधित रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात येणार असून चष्मा वाटप करण्यात येणार आहे. ज्या रुग्णांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया आवश्यक आहे, त्यांची मुंबई येथिल जे.जे.रु ग्णालयात मोफत शस्त्रक्रिया या शिवसंग्रामच्या वतीने करण्यात येणार आहे.यावेळी पद्मश्री डॉ. लहाने (सहसंचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य), डॉ. रागीणी पारीख (नेत्र विभाग प्रमुख जे.जे. रूग्णालय, मुंबई) हे स्वत: व त्यांची तज्ज्ञ अशी टीम या शिबिरात उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहे.
बीड येथे आज मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:23 AM