ज्यांना या सेवेची आवश्यकता आहे त्यांनी नि:संकोचपणे सकाळी १० पूर्वी आणि दुपारी ३ वाजेपर्यंत नावनोंदणी करावी. नोंदणी केलेल्या कुटुंबांना सकाळी ११ ते १२ व सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत घरपोहोच टिफिन देण्यात येईल. त्यासाठी परीक्षित कलंत्री, नवनीत कलंत्री, अभिजित कलंत्री, विश्वजीत कलंत्री यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कलंत्री परिवाराने केले आहे.
---------- कुटुंबापुढे असतात अनंत अडचणी
बीड शहरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक कुटुंबांसमोर अडचणी उद्भवत आहेत. कोणाची पत्नी व मुले संक्रमित झाली आहेत तर एखाद्या कुटुंबात पती-पत्नी संक्रमित झाले असून, मुले घरी एकटेच आहेत. त्यांच्या व्यवस्थेची सर्वांत मोठी समस्या अनेक कुटुंबांसमोर आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी कलंत्री परिवाराने शुद्ध शाकाहारी भोजन विनाशुल्क घरपोहोच देण्याची व्यवस्था केली आहे.
--------
मदतीचे हात थांबत नसतात
शहरात कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सुविधेसाठी शहरात प्रवीण, अतुल, राजेश मौजकर व परिवार तसेच धनंजय वाघमारे परिवारासह अनेकांनी मदतीचा उपक्रम राबविला. या सेवाभावातून अनेक जण आपआपल्या क्षमतेनुसार पुढे येत आहेत. कलंत्री परिवारातील तरुणांनी हा संकल्प बोलून दाखविला आणि ज्येष्ठांनी तत्काळ होकार देत उपक्रम सुरू झाला. सेवेची ही साखळी अनेक गरजवंतांना आधार ठरत आहे.
-------
===Photopath===
140521\14bed_1_14052021_14.jpeg