बीड : आयुष मंत्रालय, पारस मिरॅकल अहमदनगर, आंतरराष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था (आयएनओ) व बीड जिल्हा योग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जलनेती चिकित्सा, योग व निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचा नुकताच समारोप झाला. जिल्हाभर विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या शिबिरात साधकांना एक हजार जलनेती पात्र मोफत वाटप करून त्यांच्याकडून जलनेती प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.
अभियानाची सुरुवात बीड येथील डॉ. पारनेरकर महाराज मंदिरापासून करण्यात आली होती. या जनजागृती अभियानात साधकांना प्रशिक्षण देऊन विविध संघटना, आरोग्य केंद्र, वेलनेस सेंटर येथेही जलनेती योग व निसर्गोपचार जागृती अभियान राबविण्यात आले. या आरोग्यविषयक कार्यात आयएनओचे जिल्हाध्यक्ष विनायक वझे, समन्वयक अॅड. गीता वझे, डॉ. संजय तांदळे, डॉ. विजय सर्वज्ञ, डॉ. आनंद लिमकर, भारत ठोंबरे, श्रीहरी ठोंबरे, विकास गवते, अरुण कुंडलकर, गणेश भंडारे, माधव काळकुटे, नीलेश मस्के, उद्धव लाड, अंगद पघळ, अशोक गायकवाड, सूर्यकांत देशमुख, दिलीप कांबळे, ज्ञानेश मातेकर, राम म्हेत्रे आदींसह आयएनओच्या जिल्हा टीमने साधकांकडून जलनेतीची प्रात्यक्षिके करून घेतली.
महिनाभर चाललेल्या शिबिराचा गुरुवारी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे विनायक वझे, डॉ. संजय तांदळे, उध्दव लाड, प्रल्हादराव पिंगळे उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय तांदळे यांनी जलनेतीबाबतचे महत्त्व सांगून जलनेतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. भारत ठोंबरे, अर्जना ठोंबरे, वचिष्ठ राऊत, शिवकन्या राऊत, अंकुश चव्हाण, राणी जगताप, सविता नाईकवाडे, राजेंद्र खेडकर, जगताप आदींनी प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला.
सूत्रसंचालन अर्चना ठोंबरे व शिवकन्या राऊत यांनी केले. भारत ठोंबरे यांनी आभार मानले. या आरोग्यविषयक राबविलेल्या नि:शुल्क उपक्रमाबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच निमा व आयुष मंत्रालय, सुजाण नागरिक, संस्थांनी स्वागत केले.
010821\01_2_bed_6_01082021_14.jpg~010821\01_2_bed_7_01082021_14.jpg
जलनेती प्रशिक्षण देताना विनायक वझे, साधकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. ~जलनेती प्रशिक्षण देताना विनायक वझे, साधकांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.