याबाबतीत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, पुण्याकडून परभणीकडे मिनरल वाटरसह फळांचे रिकामे कॅरेट घेऊन टेम्पो (क्रमांक एमएच ३८-एक्स १५८६) जात होता. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान टेम्पो माजलगाव शहरात येताच नवीन बस स्थानकासमोर चालकाला डुलकी लागली. त्यामुळे वाहनावरील त्याचा ताबा सुटला. त्यामुळे टेम्पो पाईपचे कठडे तोडून थेट दुभाजकावर चढला. पहाटेच्या वेळी या रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. परंतु टेम्पोच्या जोरदार धडकेमुळे नगर परिषदेच्या स्ट्रीट लाईटसह डिव्हायडरवर बसवलेल्या कठड्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपघात स्थळावरून पोलिसांनी टेम्पो हटवला असून तो पोलीस ठाण्यात आणून उभा केला आहे. दुपारपर्यंत चालकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
===Photopath===
240321\purusttam karva_img-20210324-wa0017_14.jpg
===Caption===
माजलगाव येथे बुधवारी पहाटे मालवाहतूक करणारा टेम्पो लोखंडी कठडे तोडत दुभाजकावर चढला.